महाराष्ट्रात वाढल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना | Latest Political Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0

ऑनलाईन व्यवहार करण्यात एकीककडे सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात असतांना फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे अशा फसवणुकींचे प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत. क्रेडिट/डेबिट कार्ड आणि इंटरनेट बॅँकिंग फसवणुकीचे ३८० प्रकरणे राज्यातून समोर आली असून १२.१०  कोटींवर ऑनलाईन चोरट्यांनी डल्‍ला मारला आहे. माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत ऑनलाईन फसवणुकींच्या प्रकरणांची माहिती दिली. 2017 मध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या देशभरात २५ हजार ८०० प्रकरणे समोर आली असून १७९ कोटी रुपयांचा यात समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात १० हजार २०० प्रकरणे समोर आली असून त्यात ११५.८५ कोटी रुपयांचा समावेश आहे. 
महाराष्ट्रानंतर फसवणुकीचा सर्वाधिक फटका हरियाणाला बसला आहे. तेथून २३८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून ८ कोटींची रक्‍कम आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires